हैदराबादचा चेन्नईविरुद्ध 5 फलंदाज राखून विजय   

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 हंगामात शुक्रवारी खेळल्या गेलेल्या चेन्नईविरुद्ध हैदराबाद या 43 व्या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. चेन्नईच्या संघाला 154 धावांवर रोखले. याचबरोबर हैदराबादच्या संघाने 5 फलंदाज राखुन विजय मिळविला. हैदराबादच्या गोलंदाजांपैकी हर्षल पटेल याने महत्त्वपुर्ण 4 बळी घेतल्या. त्यामुळे
त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. तर महमद शमी, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकट, आणि कामिंदू मेंडीस यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला. 
 
या सामन्याआधी हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नईच्या संघाने 19.5 षटकांत 154 धावा केल्या. त्यामुळे हैदराबादला 155 धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबदच्या संघाकडून सलामीवीर हेड याने 19 धावा केल्या. त्याला अनशुल कंबोज याने त्रिफळाबाद केले. तर सलामीवीर अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला. इशान किशन हा 44 धावा करून नूर अहमद याच्या गोलंदाजीवर सॅम करन याच्याकडे झेलबाद झाला. क्लासेन याने 7 धावा केल्या. रवींद्र जडेजा याने शानदार गोलंदाजी करत दीपक हुडा याच्याकडे त्याला झेलबाद केले.  त्यानंतर मधल्या फळीतील अनिकेत वर्मा हा 19 धावांवर बाद झाला. नूर अहमद याने शानदार गोलंदाजी करत दीपक हुडा याच्याकडे त्याला झेलबाद केले. कामिंदू मेंडीस याने नाबाद 32 धावा करत हैदराबादला सामना जिंकून दिला. नितीशकुमार रेड्डी याने त्याला साथ देताना नाबाद 19 धावा केल्या. 15 अवांतर धावा हैदराबादच्या संघाला मिळाल्या. 
 
त्याआधी चेन्नईच्या संघाकडून फलंदाजी करताना रशीद हा शून्यावर बाद झाला. त्यावेळी चेन्नई संघाची एकही धाव झाली नव्हती. आयुष म्हात्रे याने 30 धावा केल्या. कमिन्स याने शानदार गोलंदाजी करत इशान किशन याच्याकडे त्याला झेलबाद केले. सॅम करन याने 9 धावा केल्या. हर्षल पटेल याने त्याला अनिकेत वर्माकडे झेलबाद केले. रवींद्र जडेजा याने 21 धावा केल्या. कामिंदू मेंडीस याने त्याचा त्रिफळा उडविला. डेवाल्ड ब्रेविस हा 42 धावांवर बाद झाला शिवम दुबे 12 धावांवर असताना जयदेव उनाडकट याने त्याला अभिषेक शर्माकडे झेलबाद केले. धोनी हा अवघ्या 6 धावांवर हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माकडे झेलबाद झाला. अनशुल कंबोज हा 2 धावांवर तर नूर अहमद 2 धावांवर बाद झाला. 
 
संक्षिप्त धावफलक
हैदराबाद : अभिषेक शर्मा 0, हेड 19, इशान किशन 44, क्लासेन 7, अनिकेत वर्मा 19, कामिंदू मेंडीस नाबाद 32, नितीशकुमार रेड्डी नाबाद 19, अवांतर 15 एकूण 18.4 षटकांत 155/5
 
चेन्नई : रशीद 0, आयुष म्हात्रे 30, सॅम करन 9, धोनी 6, रवींद्र जडेजा 21, डेल्वाड ब्रेविस 42, शिवम दुबे 12, दीपक हुडा 22, अनशुल कंबोज 2, नूर अहमद 2, खलील अहमद 1 एकूण 19.5 षटकांत 154/10

Related Articles